
सामना ऑनलाईन । बीजिंग
चीनमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगविंग हिला कर बुडविल्याप्रकरणी तब्बल ९५१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फॅन बिंगविंग ही जुलैपासून बेपत्ता आहे.
फॅन केवळ चीनमध्ये नव्हे, तर हॉलीवूडमध्येही लोकप्रिय आहे. तिच्यावर आणि तिच्या कंपनीवर कर बुडवल्याचा आरोप आहे.फॅन हिने आपले खरे उत्पन्न लपविले असून कर चुकविण्यासाठी कमी उत्पन्न दाखविल्याचा तिच्यावर आरोप आहे. पोलिसांनी फॅन हिच्या एजंटला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कर चोरीसाठी तिला सर्वाधिक ९५१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड निर्धारित कालावधीत न भरल्यास तिला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. यानंतर जुलैपासून बेपत्ता असलेल्या फॅन बिंगविंगने अखेर सोशल साईटवर माफीनामा लिहिला आहे.

























































