
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदी मनोरंजन क्षेत्रातल्या प्रवेशाची एक पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्तित्व, आय.एन.टी आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या गटासाठीच्या हिंदी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची ठरणार अशी चिन्ह आहेत. अटीतटीच्या प्राथमिक फेरीत २० एकांकिकांमधून पाच एकांकिका अंतिम मध्ये दाखल झाल्या आहेत. येत्या रविवारी सात ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा पासून विलेपार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात ही अंतिम फेरी संपन्न होईल.
म.ल डहाणूकर महाविद्यालयाची पराग ओझा लिखित दीपक घोगळे,भावेश सुर्ते दिग्दर्शित ‘कुआँ मा डूब जाउँगी’,दालमिया थिएटरची प्रमित बारोट लिखित लतेश,प्रमित दिग्दर्शित ‘घरवाले दुल्हनिया दे जाएँगे’, क्रिएटिव्ह डस्टबिनची आयुष पाल चौधरी लिखित स्वराज कांबळे दिग्दर्शित ‘दुलारी’, भवन्स कॉलेजची शशांक जाधव लिखित दिग्दर्शित ‘खोल दो’ आणि उषा प्रवीण गांधी महाविद्यालयाची अनिकेत पाटील लिखित – दिग्दर्शित ‘दृष्टी’ या एकांकिका अंतिममध्ये सादर होतील. मराठी रंगकर्मींचा मोठा ठसा अंतिम फेरीतल्या एकांकिकांवर दिसून येतो. त्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता नाट्यक्षेत्रात आहे.
summary- int hindi finale on 7 october



























































