
सामना ऑनलाईन,मुंबई
पेट्रोलच्या दरांतील कपातीपाठोपाठ डिझेलच्या दरातही कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला. केंद्र सरकारने गुरुवारीच 2.50 रुपयांची कपात केल्यानंतर राज्य सरकारने 1 रुपये 56 पैशांची कपात केली. यामुळे महाराष्ट्रात डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त झाले आहे. महागाईच्या उद्रेकात डिझेल दरवाढीमुळे भर पडली होती. यामुळे सरकारविरोधी वातावरण तयार होत असताना गुरुवारी झालेल्या पेट्रोल दर कपातींपाठोपाठ आज डिझेलच्या दरातही कपात करण्यात आली. कर सवलतीसह एकूण 1 रुपये 56 पैशांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे केंद्राचे अडीच रुपये व राज्याचे 1 रुपये 56 पैसे असे मिळून लिटरमागे 4 रुपये 6 पैशांची कपात झाल्याने डिझेल स्वस्त होणार आहे.



























































