
>> विवेक दिगंबर वैद्य
‘मेरे प्यारे सुंदर भारतपर। दुष्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत के इस आजादीपर। परदेशी नजर ना लगे, अरे तू सुन।’ हिंदुस्थानचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला खडे बोल सुनावणारा साधू किंवा संतही असू शकतो याची जाणीव पहिल्याप्रथम जर का पुणी करवून दिली असेल तर ते होते कर्ममार्ग व सेवाव्रताचे ध्येय उराशी बाळगणारे ‘राष्ट्रसंत’ श्रीतुकडोजी महाराज.
प्राचीन संस्पृती व देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान, त्यासोबतच सुधारणा व लोकशिक्षणाचा ध्यास घेतलेल्या तुकडोजींना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी हिंदुस्थानचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिली तेव्हा समस्त देशाला ‘हा आपलाच गौरव आहे’ असे वाटले. तुकडोजींची ‘ग्रामगीता’ या देशाने भगवद्गीतेइतकीच महत्त्वाची मानली यातच त्यांच्या राष्ट्रकार्याची प्रचीती येते.
तुकडोजी महाराजांचे खरे नाव माणिक नामदेव इंगळे. विदर्भातील अमरावतीमधील यावली खेडेगावात भाट-ठापूर पुटुंबातील नामदेव इंगळे यांच्या पोटी जन्मलेले पुत्र‘रत्न’ स्वकर्तृत्वाने ‘माणिक’ हे नाव सार्थ करते झाले. घरात अठराविश्वे दारिद्रय़ पाचवीलाच पुजलेले. त्यात वडील व्यसनी असल्याने त्यांचा शिंप्याचा धंदा डबघाईला आला. पुटुंबाचे काहीतरी भले व्हावे म्हणून इंगळे पुटुंबीय चांदूर बाजार येथे आले. वडिलांनी गुळाच्या व्यापाराचा उद्योग सुरू केला. आई देवभोळी, भजनपूजनात रमत होती. तिच्यातील देवभोळेपण माणिकमध्ये उतरले आणि शाळेपेक्षा मंदिराच्या ओसरीवर रमू लागले.
चांदूरलाही अपेक्षेप्रमाणे धंद्याचा जम न बसल्याने नामदेव इंगळे चिंतेत होते. भरीस भर म्हणून माणिक अभ्यासात लक्ष देईना. त्याचा काळवेळ भजन, कीर्तनात रमत होता. शाळेला दांडी मारून मारुती वा शंकराच्या देवळात जाणे, भजन-कीर्तन करणे हा त्याचा छंद बनला. पुढे तर एकटय़ाने रानावनात, जंगलात जाणे व तेथे तल्लीन होऊन भजने करणे त्याला विशेष आवडू लागले. शिवमंदिरातील हनवंतीबुवांच्या खंजिरीवादनाने प्रभावित होऊन माणिक खंजिरी वादनामध्येही निपुण झाला. चांदूर येथे होणारी पुटुंबाची आबाळ लक्षात घेता माणिकची त्याच्या आईसह वरखेडे येथे राहणाऱया मामाकडे, गोविंदराव वानखेडे यांच्याकडे पाठवणी करण्यात आली. याच ठिकाणी माणिकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती संतश्रेष्ठ आडपूजी महाराज यांच्यामुळे.
आडपूजी महाराज नाथपंथीय होते. त्यांच्या सहवासाची गोडी माणिकला लागली. खंजिरी वाजवत गोड आवाजात माणिक भजनं गात असे आणि त्या तालावर आडपूजीबाबा दंग होत असत. त्यांच्या सहवासात माणिकच्या आयुष्याला नवी दिशा लाभली शिवाय ‘तुकडोजी’ हे नवे नावही मिळाले. 1921 साली समाधिस्त झालेले आडपूजीबाबा हे तुकडोजींचे गुरू. त्यांच्या प्रेरणेने भजन कीर्तनात दंग झालेल्या तुकडोजींचा हा परमेश्वरप्राप्तीचा ध्यास त्यांच्या वडिलांना आवडला नाही. नामदेवरावांनी तुकडोजींना झोडपले. वडिलांचा मार सहन न झाल्यामुळे तुकडोजींनी घर सोडले आणि ते थेट जंगलात निघून गेले. त्यांनी ताडोबा, रामटेक, दीघीच्या घनघोर अरण्यात तपसाधना करण्यास सुरुवात केली. कित्येक दिवस आणि अनेक वर्षे सरली. पुढे त्या अरण्यात अवचितपणे भेटलेल्या एका साधूचा वरदहस्त प्राप्त होताच तुकडोजी ध्यानधारणेच्या अवघड मार्गापासून समाधी लागण्याच्या श्रेष्ठ अवस्थेपर्यंत पोहोचते झाले. सर्व सिद्धींनी संपन्नता लाभलेल्या तुकडोजींनी चित्तूरच्या अरण्यात उन्मनी व विदेहावस्थेत राहून ईश्वरप्राप्ती साध्य केली. पुढे तावूनसुलाखून बाहेरील जगात प्रवेश करताना मात्र तुकडोजींनी लोकसेवेचे व्रत घेतले. परमेश्वराचे अस्तित्व प्रत्येक सजीवामध्ये आहे मग त्याचीच सेवा करायची, अशक्त लेकरांचे पुनरुत्थान करायचे हीच देवाची सेवा, अशा रंजल्या गांजल्यांमध्येच परमेश्वर शोधायचा ही समृद्ध जाणीव उराशी बाळगून तुकडोजी या लौकिक जगामध्ये पुन्हा एकदा येते झाले.
तो काळ पारतंत्र्याचा होता. ब्रिटिश सरकार विरुद्धच्या असंतोषाचा खदखदणारा आवेश तुकडोजींनी त्यांच्या भाषणांतून, पोवाडय़ांतून, भजन-अभंग-कीर्तनातून प्रकट केला. तुकडोजींच्या मार्गदर्शनाखाली सामान्य जनता, अशिक्षित आदिवासी एकत्र येत आहेत, राष्ट्रधर्माचे स्फुल्लिंग पेटवीत आहेत ही खबर महात्मा गांधींच्या कानावर गेली. त्यांनी तुकडोजींना तात्काळ ‘सेवाग्रामी’ बोलावले. तेथे काही दिवसांच्या वास्तव्यात तुकडोजींनी ‘लहर की बरखा’ हे पुस्तक लिहिले. तुकडोजींच्या वरकरणी साध्या, सोप्या वाटणाऱया शब्दांत असलेले स्पह्टक विचार, निखळ राष्ट्रप्रेम व क्रांतीची धगधगती आग गांधीजींना प्रचंड प्रभावित करून गेली. ‘उँचा मकान तेरा, पैसी मंझील चढू मै’ हे गांधीजींचे आवडते भजन तन्मयतेने गाणाऱया तुकडोजींना गांधीजींनी ‘फिर एक बार गाओ’ असे म्हणत उत्स्फूर्त दाद दिली. भावपूर्ण गायन करणाऱया तुकडोजींच्या शब्दसामर्थ्याने त्यांनी तरुण पिढी खिळवून ठेवली. तुकडोजींच्या प्रेरणेने पुढे अमरावती, यवतमाळ व नागपूर या विदर्भ प्रांतात ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यात आले आणि त्याचा परिणाम म्हणून तुकडोजींना अटक करण्यात आली. अंधश्रद्धा, बुवाबाजी, देवभोळेपणा यांच्याविरुद्ध प्रखर लढा देणाऱया तुकडोजींनी जनजागृतीचे कार्य करतानाच जातीयवाद, प्रांतीयवाद, उच्च-नीचता यांवर सडपून टीका केली. एकदा एक साधू हवेतून अंगारा, उदी काढण्याचे चमत्कार करीत असताना त्याला तुकडोजींनी बंगालमधील दुष्काळाचे उदाहरण देत हवेतून तांदूळ, गहू काढण्याचे आव्हान दिले. साधूने असमर्थता व्यक्त करताच त्याला, ‘गोरगरीबांची फसवणूक करण्यापेक्षा काम करा, ईश्वरभक्ती करा, जनसेवा करा’ असा रोखठोक सल्ला दिला.
खंजिराच्या तालावर, थेट काळजास हात घालणाऱया या कर्मयोगी संताला पंढरपूरच्या वाळवंटात जे सत्य उमगले तेच सत्य ‘ग्रामगीते’च्या 41 अध्यायातून प्रकट झाले. निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारी ही ‘ग्रामगीता’ श्रीमद् भगवद्गीतेप्रमाणे अजरामर झाली. संस्पृतीचा जाज्वल्य अभिमान व अद्ययावत जीवनमूल्यांचा आग्रह धरणाऱया, संतांचे हृदय लाभलेल्या तरीही वीरपुरुषांची आक्रमकता बाळगणाऱया, हिंदूधर्माला ‘विश्वधर्म’ मानणाऱया तुकडोजींना गाडगे महाराजांनी ‘आधुनिक भगवद्गीतेचा जनक’ म्हणून गौरविले. रूढ अर्थाने साधुसंतांची कोणतीही लक्षणे न दाखविलेल्या तरीही कर्तृत्वाने संतपदास पोहोचलेल्या माणिक नामदेव इंगळेने 11 ऑक्टोबर 1968 मध्ये ब्रह्मानंदात लीन होण्याचे ठरविले, तरीही तुकडोजींच्या रूपाने अजरामर होण्यास त्याला पुणीही रोखू शकले नाही.




























































