
सामना प्रतिनिधी, मुंबई
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारने नुकतीच कपात केली. परंतु आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ पाहायला मिळाली. मुंबईत पेट्रोल 18 पैशांनी महागले. आज मुंबईत पेट्रोलचा दर 87.15 रुपये प्रतिलिटर इतका होता. दरम्यान, डिझेलच्या दरात मात्र 70 पैशांची कपात दिसली. डिझेलचे दर 76.75 इतके झाले.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला खरा, पण हा दिलासा काही काळापुरताच ठरला. कारण पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ दिसली. ही वाढ पुढेही होण्याची शक्यता आहे.
का झाली दरवाढ ?
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्सचे भाव 1600 अंकांनी घसरले, तर रुपयाही नीचांकी स्तरावर गडगडला. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत 74 वर पोहोचला असून कच्च्या तेलाच्या किमती भडकलेल्याच असल्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे.
summary- petrol price got hike again




























































