आईच्या शरीरातील वडिलांचे भूत घालविण्यासाठी मुलाने केली तिची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या ओशिवरा परिसरात एका नामवंत फॅशन डिझायनरची तिच्या मुलाने हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या महिलेच्या मुलाला तिच्या शरीरात त्याच्या वडिलांचे भूत शिरल्याचा संशय होता. त्यातूनच त्याने आईची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री फॅशन डिझायनर सुनिता सिंह यांची त्यांचा मुलगा लक्ष्यने जबर मारहाण केली होती. त्यात सुनिता यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी लक्ष्यला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्याायालयात हजर केले असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. मात्र आईला मारहाण का केली याचे कारण त्याने सांगितल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. लक्ष्यला त्याच्या आईच्या शरीरात त्याच्या मृत वडिलांचा आत्मा शिरल्याचा संशय होता. वडिलांचे भूत पळवून लावण्यासाठी तो आईला मारहाण करत होता. असे लक्ष्यने न्यायालयात सांगितले