
सामना प्रतिनिधी। मोखाडा
बँकेतील काम आटोपून घरी जाणाऱया अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मोखाडा येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तेही अल्पवयीन आहेत.
पीडित मुलगी किनिस्ते येथे राहते. काही कामानिमित्त ती वाकडपाडा येथील बँकेत गेली होती. काम आटोपून घरी जात असताना दोन अल्पवयीन मुलांनी तिला छेडले आणि बांदोराजवळ येथे नेले. तिथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची फिर्याद स्वतः त्या पीडित मुलीने मोखाडा पोलीस ठाण्यात दिली असून दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घरी जाऊन ताब्यात घेतले.





























































