
सामना ऑनलाईन । मानखुर्द
पुण्यात रेल्वे स्थानकाजवळ महाकाय होर्डिंग कोसळून चार जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी वाशी खाडी पुलाजवळ मानखुर्दच्या हद्दीत ओव्हरब्रीज कोसळला. त्यामुळे तिथे असलेली महाकाय क्रेनदेखील उलटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सायन-पनवेल मार्गावरील मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. वाशी टोलनाका बंद झाल्यानंतर या पुलाचा वापर थांबला होता. त्यामुळे पुलाच्या एका बाजूचा भाग काढून टाकण्यात आला. दुसऱया बाजूकडील उर्वरित भाग क्रेनच्या सहाय्याने रविवारी काढण्याचे काम सुरू असतानाच हा पूल कोसळला. या घटनेमुळे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


























































