कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गंगापूर

तालुक्यातील सिरसगाव येथील आसाराम येडुबा आधाडे (६५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापिकी, याही वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे डोक्यावर असलेले कर्ज पेâडणे शक्य नसल्यामुळे नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.

शनिवार, ६ रोजी सिरसगाव येथील शेतकरी आसाराम येडुजी आघाडे (६५) यांनी राहत्या घरी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांंना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगरला घाटीत पाठविले. रविवार, ७ रोजी उपचारादरम्यान पहाटे ३.३० वाजच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आसाराम आघाडे यांच्याकडे तीन एकर जमीन होती. त्यांच्यावर सोसायटीचे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असल्याची माहिती घरच्यांनी दिली. गेल्या चार-पाच वर्षांपासून तालुक्यात सतत दुष्काळामुळे शेतीत ना पाणी ना पीक यामुळे कर्ज फेडणे कठीण होत असल्याने व शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते.