‘राफेल’ करार सर्वोच्च न्यायालयात,याचिकांवर उद्या सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी करारावरून केंद्र सरकारवर आरोपांच्या फेऱ्या झडत असतानाच आता हा करार सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवारी (दि. 10) सुनावणी होणार आहे.

ऍड. एम. एल. शर्मा यांनी फ्रान्सकडून 36 ‘राफेल’ खरेदी करण्याचा करार रद्द करावा, अशी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निश्चित केले असताना पुन्हा दोन याचिका आज दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांची सुनावणी एकत्रित होणार आहे. ऍड. विनित धांडा यांनी ‘राफेल’ कराराची माहिती सरकारला सार्वजनिक करायची नसेल तर न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. ‘राफेल’ विमानांची किंमत कशी वाढली? ‘राफेल’चे कंत्राट ‘एचसीएल’ला न देता रिलायन्सला का दिले? असे सवाल त्यांनी केले आहेत. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनीही याचिका दाखल करून ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली आहे.