
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. बुधवारी रात्रीपासून ही चकमक सुरू झाली होती.
Two terrorists killed in Handwara encounter. Arms and ammunition recovered. Identities of the slain terrorists are yet to be ascertained. Operation continues: J&K police https://t.co/0WKsON9bEH
— ANI (@ANI) October 11, 2018
हंदवाडा जिल्ह्यातील सतगुंड भागात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानंतर या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आलेली. त्यामुळे या भागातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी दहशतवादी व जवानांमध्ये चकमक झाली त्यानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अद्याप एक दहशतवादी लपला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून जवान त्याचा शोध घेत आहेत.
























































