
सामना ऑनलाईन । मुंबई
देशाभरात गाजत असलेल्या #MeToo कॅम्पेनमुळे खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराची रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. बॉलिवूडपासून ते क्रिकेट आणि राजकारण व प्रसारमाध्यमांमध्येही या कॅम्पेनने खळबळ उडावून दिली आहे. त्यामुळे आता #MeToo कॅम्पेनचा कॉर्पोरेट कंपन्यांनी देखील धसका घेतला आहे. आपल्या कार्यालयात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्यासाठी अनेक कंपन्यांची धावपळ सुरु झाली आहे.
#MeToo कॅम्पेनमुळे अनेक कंपन्यांमध्ये कामाच्या ठिकाणी महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महिला कर्मचाऱ्यांना कायद्याचे प्रशिक्षण देण्याऱ्या संस्था आणि वकिलांना कार्यालयात बोलावून त्यांच्याद्वारे मार्गदर्शन दिले जात आहे. कामकाजाच्या ठिकाणी होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी काय पावलं उचलावीत याबाबत माहिती देण्याऱ्या वेबसाईटवर अचानक वाचक जास्त यायला लागले आहे, त्यामुळे वेबसाईट क्रॅश होत आहेत. अशा वाचकांची संख्या 200 टक्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलंय. लैंगिक छळाचे आरोप कामाच्या ठिकाणी, सहकाऱ्यांवर होत असतात.अशा घटना घडून नये, किंवा आरोप झाल्यास त्यावर तातडीने पावलं कशी उचलावीत यासाठी अनेक कंपन्यांनी धावपळ करायला सुरूवात केली आहे.

























































