
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले ज्युनियर परराष्ट्रमंत्री उद्या रविवारी हिंदुस्थानात परतणार असून उद्याच त्यांच्या मंत्रीपदाचा फैसला होईल, असे भाजप सूत्रांनी सांगितले.
अकबर हे ऑफिशियली विदेश दौऱ्यावर असतानाच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होऊ लागले. या आरोपांना त्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. भाजपनेही या विषयावर मौन बाळगले आहे. अर्थात त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने ते मंत्रीपदी राहणे कठीणच आहे असे काही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. अकबर यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर तक्रार नाही आणि ते मंत्री होण्यापूर्वी जे काही घडले असावे त्यावरून आरोप होत आहेत, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. अकबर यांनी पहिल्यांदा आरोपांना उत्तर द्यावे, असे भाजपला वाटते.
summary- mj akbar to come india




























































