
देवेंद्र वालावलकर, पणजी
गोवा भाजपची वेबसाईट पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. या वेबसाईटवर गेल्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद असा मेसेज झळकतोय. संदेशात मोहम्मद बिलाल टीम पीसीई असा मजकूरही लिहण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तंत्रज्ञांनी बेवसाईट पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र त्यासाठी त्यांची बरीच दमछाक होत असल्याचं कळतंय.
@GoaBJP गोवा भाजपची वेबसाईट पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केली. pic.twitter.com/ycoQLFmByf
— Saamana (@Saamanaonline) October 15, 2018
























































