
सामना ऑनलाईन । मुंबई
वयात खूप अंतर असणाऱ्या जोड्या मनोरंजन विश्वाला काही नवीन नाहीत. अगदी दिलीप कुमार-सायराबानूपासून ते मिलिंद सोमण-अंकिता कोनवरपर्यंत ही यादी लांबत जाईल. सध्या गाजत असलेल्या निक-प्रियांका, आलिया-रणबीर या जोड्यांमध्ये वयाचं अंतर बऱ्यापैकी आहे. या यादीत आता एक माजी सौंदर्यवती आणि अभिनेत्री पडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगतेय.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सुश्मिता सेन आहे. 43 वर्षीय सुश्मिता सध्या रोहमन शॉल या २८ वर्षीय मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. काही काळापूर्वीच झालेल्या लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये सुश्मिताने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी रोहमन तिच्या दोन्ही मुलींसह प्रेक्षकांत बसून तिला प्रोत्साहन देत होता. अनेक वेळा विविध समारंभांमध्येही ते दोघे एकत्र दिसले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली आहे.

सुश्मिताच्या दोन्ही मुली रिनी आणि अलिशासोबत रोहमनचं खूप छान नातं आहे. त्यामुळे लवकरच सुश्मिता चाहत्यांना चांगली बातमी देईल अशी शक्यता आहे. सुश्मिताचं नाव यापूर्वी दिग्दर्शख विक्रम भट्ट, हॉटेल व्यावसायिक संजय नारंग, सबीर भाटिया, अभिनेता रणदीप हुडा, मुदस्सर अजीज यांच्यासोबतही जोडलं गेलं आहे.
summary- sushmita sen dating rohaman shawl























































