औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात भोसकून खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना प्रतिनिधी । जालना

शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली आहे. दत्ता उढान (वय 32, रा. चंदनझीरा, जालना) असे मयताचे नावे आहे.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एका इसमाचा मृतदेह असल्याची खबर चंदनझीरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह दत्ता उढान यांचा असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान मयत दत्ता उढान यांच्यावर चाकूचे तीन-चार वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.