‘आय लव्ह यू 2’कालिदासमध्ये रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

थिएटर पीपल्स प्रस्तुत ‘आय लव्ह यू 2’ हे तुफान विनोदी हिंदी नाटक येत्या रविवारी 21 ऑक्टोबर रोजी मुलुंडच्या कालिदास सभागृहात रात्री 9 वाजता रंगणार आहे. संजय झा यांनी हे नाटक लिहिलेले असून तुषार एम. जोशी यांनी त्याला दिग्दर्शन दिले आहे. किशन या एका हॅण्डसम नवऱ्याची ही विनोदी कहाणी आहे.त्याला दोन पत्नी आहेत. पण त्या दोघींनाही एकमेकींबद्दल माहीत नाही. ती लपवालपवी करताना किशनची होणारी दमछाक या नाटकात दाखवण्यात आली आहे. किशनची ही भूमिका हितेन तेजवानी यांनी केली आहे, तर मीरा आणि मारीया या त्याच्या दोन पत्नींच्या भूमिकांमध्ये तोरल रासपुत्र आणि फाल्गुनी राजानी या दिसतात.