फॅशन पॅशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशा शेलार

आवडती फॅशन…साडी नेसायला आवडते. चंदेरी, महेश्वरी साडी.

फॅशन म्हणजे…आपल्याला जे योग्य वाटते आणि आपल्यावर जे शोभून दिसतं ती फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता…फार वेगवेगळ्या प्रकारचे, रंगीबेरंगी कपडे आणि सगळ्या पद्धतीच्या साडय़ा नेसायला आवडतात.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…अजिबात नाही. फॅशन म्हणजे कपडय़ांबरोबर वेगवेगळा मेकअप, ऍक्सेसरीज.

आवडती हेअरस्टाईल?…बॉप कट मला चांगला वाटतो, पण गेल्या सात-आठ वर्षांत माझ्या व्यक्तिरेखेमुळे मोठेच केस ठेवावे लागतात.

फॅशन जुनी की नवी?…दोघांचे मिक्स्चर करायला आवडते. इंडो-वेस्टर्न. यामध्ये जुन्या सगळ्या गोष्टी नव्या कपडय़ांमध्ये मिक्समॅच करून वापरते.

आवडता रंग?…लाल.

तुमच्या जवळच्या लोकांना तुमची कोणती फॅशन आवडते….एकच सांगता  येणार नाही. माझ्या जवळच्या लोकांना मी विविध प्रकार केलेले आवडतात, पण मला इंडो-वेस्टर्न चांगले वाटते. साधारण इंग्लिश रंग असलेले कुठलेही कपडे चांगले वाटतात, असं त्यांचं मत असतं.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…पूर्वी खूप करायचे, पण आता नाही. आता तेवढे पेशन्स नाहीत. आता मला शॉपिंगसाठी जायलाच आवडत नाही. याला कारणीभूत म्हणजे माझ्या अवतीभवती असणारी भरपूर माणसे. ते माझी काळजी घेत असतात माझ्या बहिणी, भाच्या.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…ब्लाऊजेस.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…इअरिंग्स.

आवडता ब्रॅण्ड…बिबा, ग्लोबस.

फॅशन फॉलो कशी करता?….फॉलो बिलो करत नाही. जे चांगले दिसते किंवा जे काही माझ्याकडे नाही, ते खरेदी करते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…माझ्या भाचींची खूप मदत होते. त्या प्रत्येकीला फॅशनबाबत चांगला सेन्स आहे. आम्ही आठ बहिणी आहोत. मला तरुण वयोगटातील भाच्या आहेत. त्यांच्याबरोबरच माझ्या सगळ्याच मित्रमैत्रिणींची मला मदत होते. मी सगळ्यांचे ऐकते आणि त्यातून मला जे चांगले वाटते ते घेते.

ब्युटी सिक्रेट…साधं राहणीमान, गालावरची खळी.

टॅटू काढायला आवडेल का?…नाही. वेदना घेऊन टॅटू काढावा असे वाटत नाही. भूमिकेसाठी आवश्यक असल्यास स्टिकर घेऊन लावेन आणि मिरवेन.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…लिपस्टिक, डिओ, नेलकटर.

फिटनेससाठी…चालणे. जे अंतर चालून जायचे आहे तिथे चालतच जाते. खाण्यापिण्याच्या सवयी खूप प्रमाणात सांभाळते. शक्य तेवढा योग्य आहार घेते.