मी फिक्सिंग केली! पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराची

गेली अनेक वर्षे फिक्सिंगवरील आरोप खोटे असल्याचे सांगणारा पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने अखेर गुरुवारी स्पॉटफिक्सिंग केल्याचे कबूल केले. तसेच तो पुढे म्हणालाय, क्रिकेटप्रेमींनी मला माफ करावे. क्रिकेटने माझ्या आयुष्यात खूप काही दिलं आहे. मला आता याची परतफेड करायची आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने मला आणखी एक संधी दिल्यास मी तरुण पिढीला मदत करायला तयार आहे. जर तुम्ही चूक केली तर तुमचे करीअर माझ्यासारखंच उद्ध्वस्त होईल, हे मी त्यांना सांगणार असल्याचे त्याने पुढे सांगितले.

दानिश कनेरियाने ‘अल जझिरा’ या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीपटात फिक्सिंगची कबुली केली. दरम्यान, इंग्लिश कौंटी सामन्यात फिक्सिंग केल्याप्रकरणी दानिश कनेरियावर आजीवन बंदी आहे

यावर एक नजर

  • एसेक्स-डरहॅम यांच्यामधील लढतीत फिक्सिंग झाली होती.
  • दानिश कनेरिया व मर्वेन वेस्टफिल्ड यांनी अनु भट या सट्टेबाजाच्या सांगण्यावरून फिक्सिंग केली होती.
  • एका षटकात निश्चित धावा देण्यासाठी मर्वेन वेस्टफिल्डला 5 लाख 80 हजार रुपये देण्यात आले होते.
  • मर्वेन वेस्टफिल्डने फिक्सिंग केल्याचे तेव्हाच कबूल केले होते.
  • आयसीसी व इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्यावरील आजीवन बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी दिनेश कनेरियाने वारंवार अपील केले, पण त्याचे अपील फेटाळून लावण्यात आले.