सायनाने यामागुचीला चार वर्षांनंतर हरवले, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ओडेनसे

हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ सायना नेहवाल हिने तब्बल चार वर्षांनंतर जपानच्या अकाने यामागुचीला हरवण्याची करामत करून दाखवली. हिंदुस्थानच्या अनुभवी खेळाडूने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीला 21-15, 21-17 अशा फरकाने हरवत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलेल्या सायना नेहवालने अवघ्या 36 मिनिटांमध्ये विजय मिळवला. सायना नेहवालने याआधी 2014 साली चायना ओपनमध्ये अकाने यामागुचीला हरवले होते. या वर्षी उबेर कप व मलेशिया ओपनमध्येही अकाने यामागुचीने बाजी मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सायना नेहवालसमोर जपानच्याच नोझोमी ओकुहरा हिचे आव्हान असणार आहे. दरम्यान, समीर वर्माने पुरुष एकेरीत आणि अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी दुहेरी घोडदौड केली.