दुष्काळी मदत करायची नसेल तर कर्नाटकात स्थलांतर करतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पंढरपूर

बारमाही दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील 45 गावांतील गावकऱयांची ग्रामसभा पार पडली. या सभेत एकमुखाने करण्यात आलेल्या ठरावात महाराष्ट्र सरकारने या गावांकडे कायम दुर्लक्ष केले असून या गावांचे पालकत्व स्वीकारायचे नसेल तर आम्ही कर्नाटक राज्यात स्थलांतर करतो. शासनाने आम्हाला संमती द्यावी, असा एल्गार या गावकऱ्यांनी केला आहे.

गावांच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील नागरिकांना कर्नाटक शासनाने दुष्काळी मदत दिली आहे. महाराष्ट्रातील गावे मात्र मदतीपासून वंचित आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील गावांची दुष्काळी परिस्थिती सारखी आहे. मात्र महाराष्ट्र शासन परिस्थितीबाबत गंभीर नाही.

summary- 45 villages warn state govt over drought fund