
सामना प्रतिनिधी, कल्याण
गरीबांच्या हातगाडय़ा, टपऱयांवर बुलडोझर चालवणाऱ्या पालिका प्रशासनाने भाजप आमदाराच्या बेकायदा रिक्षा स्टॅण्डना मात्र अभय दिले आहे. कल्याणच्या स्टेशन परिसरात भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी बेकायदा रिक्षा स्टॅण्ड उभे करून वाहतुकीचा बट्ट्याबोळ केला असताना ते उखडून टाकण्यासाठी अधिकारी फिरकलेले नाहीत. अनधिपृत बांधकाम नियंत्रक सुनील जोशींचे पवार यांच्याशी सेटिंग असल्यानेच त्यांच्या बेकायदा कामांना अभय दिले जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
शहरात वर्दळीच्या रस्त्यांवरच नरेंद्र पवार अध्यक्ष असलेल्या रिक्षाचालक संघटनेने बेकायदा रिक्षा स्टॅण्ड ठोकले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरटीओ, पालिका प्रशासन सुस्त असल्याने बेकायदा रिक्षा थांब्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. अखेर दैनिक ‘सामना’तून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यातच अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनीही पालिका आणि आरटीओ प्रशासनाला शहरातील बेकायदा रिक्षा थांबे तत्काळ हटवण्याबाबत बजावले. मात्र पालिकेने कारवाईचे केवळ नाटक केले.
… स्वतःची पाठ थोपटून घेतली
शहरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड तोडण्यास निघालेले पथक थेट टपऱया तोडून आले. सुनील जोशी यांनी 12 टपऱ्या, 25 हातगाडय़ा तोडल्याचे सांगत त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र स्टेशन परिसरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड मात्र कधी तोडणार याचे अवाक्षरही त्यांनी काढले नाही.
कुंपणच शेत खातंय
अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी कल्याणमधील सर्व बेकायदा रिक्षा थांबे तत्काळ हटवण्याबाबत पालिकेला पत्र पाठवले. मात्र पालिका प्रशासनच आमदार नरेंद्र पवार यांच्या बेकायदा कामांना पाठीशी घालत असून कुंपणच शेत खात असल्याच्या या प्रकाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
summary- bulldozer on stalls in kalyan






























































