खगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लंडन

दिवंगत खगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअरचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. मेंदूसंबंधित आजारामुळे व्हीलचेअरवरूनच त्यांनी प्रकाशवर्षे, कृष्णविवरे आणि इतर जगविख्यात संशोधने मांडली. व्हिलचेअरबरोबरच त्यांची पदके, पुरस्कार आणि पीएचडीच्या प्रबंधांचाही लिलाव केला जाणार आहे.

  • इंग्लंडमधील क्रिस्ती ऑक्शन हाऊसतर्फे 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत हा लिलाव होणार आहे.
  • 1960 सालच्या शेवटापासून त्यांनी व्हीलचेअर वापरायला सुरुवात केली. मात्र, आता जिचा लिलाव केला जाणार आहे ती व्हिलचेअर त्यांनी 1980 ते 1990 सालापर्यंत वापरली आहे.
  • लिलावातून एकूण 1 लाख 50 हजार पाऊंड मिळतील अशी अपेक्षा असून ही सर्व रक्कम ‘द स्टिफन हॉकिंग फाऊंडेशनला देण्यात येणार आहे.