
सामना प्रतिनिधी, संग्रामपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मुद्रा योजनेने आज एका होतकरू तरुणाचा बळी घेतला. वारंवार खेटय़ा घालूनही स्टेट बँकेने मुद्रा योजनेतून कर्ज न दिल्याने बुलढाणा जिल्हय़ातील सागर दिनकर वाघ (24) या तरुणाने गळफास घेतला. मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून त्याने आपला मृतदेह तहसील कार्यालयात नेऊन ठेवावा असे म्हटले होते. त्यानुसार गावकऱ्यांनी मृतदेह तहसीलमध्ये आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला.
एम.कॉम झालेल्या सागर वाघ याने मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी कर्ज मिळावे म्हणून पंचायत समिती व स्टेट बँकेकडे अनेक वेळा खेटय़ा घातल्या परंतु सागरच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी कंटाळून सागरने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आईवडील, एक भाऊ असा परिवार आहे. शासनाने मृताच्या कुटुंबाला पाच लाख रुपये रोख द्यावे आणि संग्रामपूर स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक तांदळे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सागरच्या कुटुंबीयांसह गावकऱयांनी केली आहे.
summary- youth committed suicide for not granting loan from



























































