उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. मराठवाड्याला पुन्हा एकदा मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख हे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद आधी आणि मग पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

रोज्यातील गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांसोबत शिवसेना कायम उभी आहे. त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार राज्यातील विविध भागांना भेटी देतात. तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. आज बीडमध्ये उद्धव ठाकरे येणार आहेत. त्यावेळी देखील ते आधी शेतकऱ्यांची भेटू घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर ते काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.