
सामना । नवी दिल्ली
कश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात लष्कर-ए-तैय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात हिंदुस्थानी सैन्याला यश आले आहे. तसेच गुरूवार सकाळपासून सुरू असलेली चकमकही संपली आहे.
On info that 2 millitants were hiding in a village, the area was cordoned off.Efforts were made to make them surrender.During retaliation 2 militants were killed, their identities are yet to be ascertained.Arms&ammunition were recovered: Imtiyaz Hussain,SSP on Baramulla encounter pic.twitter.com/D1DDpcObwE
— ANI (@ANI) October 25, 2018
बारामुलामध्ये दहशतवादी असल्याची खबर सैन्याला मिळाली. यावर कारवाई करत सैन्याने अथोरा गावाला चारी बाजूने घेरले. सैन्याने दहशतवाद्यांना समर्पण करण्यास सांगितले. परंतु दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला, प्रत्युत्तर म्हणून सैन्यानेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या चकमकीत सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. नंतर मृत दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली.



























































