
सामना ऑनलाईन । मुंबई
तारीक नावेद सिद्दीकी दिग्दर्शित ’द प्लेबॉय मि. सोहनी’ लघुपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मध्यवर्ती भूमिका असून या शॉर्टफिल्ममध्ये स्त्री-पुरुष यांच्यातील मनोवेधक नाते दाखविण्यात आले आहे. ही फ्लॅशबॅकमधून उलगडणारी गोष्ट आहे. यात प्लेबॉय म्हणून ओळखल्या जाणार्या एका माणसाची अनोखी प्रेमकहाणी चित्रित करण्यात आली आहे. या लघुपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक तारीक नावेद सिद्धीकी म्हणाले की, ‘द प्लेबॉय मि. सोहनी’ ही कथा प्रेक्षकांसमोर सादर करणे ही माझ्यासाठी थरारून टाकणारी गोष्ट आहे आणि आपला हा लघुपट रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सच्या मंचावरून सादर करत असल्याचा मला अभिमान आहे.




























































