‘घर घर की रौनक बढाऐ…’ आता गाणे स्वरूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नेरोलॅक पेंट्सच्या ‘घर घर की रौनक बढाऐ…’ हे जिंगल गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. हे जिंगल लवकरच गाण्याच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेरोलॅक आणि हेल्दी पेट्सने संगीतकार प्रीतमवर हे गाणे तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

हिंदीसह मराठी, मल्याळम, बंगाली, पंजाबी, तेलगू, तामीळ आणि कन्नड भाषेत हे गाणे प्रसिद्ध होणार आहे. मराठीतील गाणे किरण सातपुते याने गायले असून जुन्या रचनेत काही समकालीन स्वर आणि ताल जोडून या गाण्यावर नवा साज चढविण्यात येणार आहे. हे गाणे ओटीटी व्यासपीठ, रेडिओ चॅनल्स आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार आहे.