
सामना ऑनलाईन, पुणे
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सध्याच्या क्रिकेटपटूंबाबत स्पष्ट शब्दात त्यांची भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की हल्लीचे क्रिकेटपटू असे आहेत जे सोपा झेल टीपण्यासाठी उगाच उड्या मारतात. फलंदाज धावचीत होण्याची अजिबात शक्यता नसताना चेंडू फेकतात आणि बरेचदा तो ओव्हरथ्रो होतो आणि फलंदाजाला अतिरिक्त धावा मिळतात. बरेचदा अशा ओव्हरथ्रोमुळे संघाला सामना गमवावा लागतो असं गावस्कर म्हणाले.
Today, you see, even if there’s an easy catch, fielder dives, just because of television. Today even if there is no chance of run out, you throw the ball&that’s waste of energy. This throw, by becoming overthrow, sometimes may lead to your loss in the match: Sunil Gavaskar(26.10) pic.twitter.com/3RF76DRByG
— ANI (@ANI) October 26, 2018
क्रिकेटमधील बदलांबाबत सुनील गावस्कर बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. “सध्याची पिढी ही टीव्हीच्या जमान्यातील पिढी आहे. या पिढीसाठी क्रिकेट हा खेळ उरला नसून त्यांच्यासाठी ते मनोरंजनाचे साधन बनले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी हे त्यांच्यासाठी मनोरंजन उरलं नसून मैदानावरील हावभाव, हालचाली या देखील मनोरंजनाचाच एक भाग बनला आहे” असं गावस्कर म्हणाले. या मनोरंजनापायीच क्रिकेटपटू उगाच उड्या मारत असल्याचं गावस्कर यांनी निरीक्षण नोंदवलं आहे.



























































