आज मध्य आणि ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आज मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५पर्यंत दुरुस्तीकामे चालणार आहेत. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर रविवारी मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५पर्यंत मेगाब्लॉक चालेल. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ पर्यंत दिवा ते परळपर्यंत धीम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यापुढे या लोकल पुन्हा परळपासून जलद मार्गावर चालवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील. ब्लॉक कालावधीत या लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.

ठाण्याहून सीएसएमटी, दादरसाठी जाणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस सकाळी १०.५०नंतर मुलुंड आणि माटुंगामध्ये अप धीम्या मार्गावर चालतील. त्यामुळे गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा येथेच थांबवण्यात येणार आहे. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर रविवारी दिव्याहूनच सुटेल. दादर ते दिव्यापर्यंत मध्य रेल्वेने दुपारी ३.४० वाजता विशेष लोकल सोडली आहे. ही लोकल ठाणे आणि दिवा स्थानकांत थांबेल.

ट्रान्सहार्बर रेल्वे

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४०पर्यंत ब्लॉक चालेल. ठाण्याहून वाशीपर्यंत सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७पर्यंत आणि वाशीहून ठाण्याकडे सकाळी १०.४५ ते दुपारी ३.३८पर्यंत लोकल सेवा खंडित राहतील. या कालावधीत ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेलपर्यंतही सेवा खंडित राहतील.

summary- mega block on central and trans harbor railway