
>> रामकृष्ण पांडुरंग पाटील
आजच्या काळात मोबाईल गरजेचे रूपांतर व्यसनात कधी झाले हे आपल्याला कळलेच नाही. मोठ्यापासून लहानांपर्यंत त्याची सवय जडून गेलेली आहे. आणि सध्या तरुण पिढीवर त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहेत आणि यातूनच सोयींपेक्षा हा मोबाईल आजच्या तरुण पिढीचे जगणे हैराण करून टाकताना दिसतेय.
दोन-तीन दिवसांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली. ती बातमी म्हणजे ‘मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजार, नागपुरात पन्नास हजार रुग्ण, मेयोच्या मनोविकृतीशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष.’ खरंच बातमी वाचून मोठा धक्का बसला. कारण मोबाईल आता खरंच मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरत आहे. मेयो रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागात उपचारासाठी येणार्या साधारण 200 रुग्णांमध्ये 10 ते 15 टक्के रुग्ण हे मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात.
एका मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्रमुखांनी एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अठरा ते पंचवीस वयोगटातील शंभर मुलांवर सर्वेक्षण करण्यात आले होते व यात सर्व मुलांनी दिवसाच्या साडेसहापेक्षा जास्त तास, तर काहींनी बारा ते चौदा तास मोबाईल वापरत असल्याचे सांगितले. आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपली मुलं किंवा सर्व तरुणवर्ग दिवसाला जर एवढे तास मोबाईल वापरत असतील तर याला एक यांना लागलेलं व्यसनच म्हणावे लागेल व व्यसन कुठलेही असो त्याचे प्रमाण जर जास्त वाढले तर त्याचे किती वाईट परिणाम भोगावे लागतात हेसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. मोबाईलचा जास्त वापर केल्याने कधी कधी काही लोकांना बंद पडलेल्या मोबाईलचीही रिंग वाजतेय असे वाटते. या सर्व गोष्टींना आपल्याला भ्रम नाही म्हणता येणार. याला एक मानसिक आजारी म्हणावा लागेल. त्याला ‘फैटम व्हायब्रेशन सिंड्रोम’ असे म्हटले जाते.
आजचा तरुणवर्ग आणि मोबाईल, सोशल मीडिया हे गणित आता सर्वांना माहीत आहे. हल्ली तरुणांमध्ये मोबाईल आणि त्यामध्ये सोशल मीडिया वापरण्याचे खुळ वाढती क्रेझ ही वाढत जातेय. दिवसेंदिवस जसा काळ बदलत जातोय तसा तरुणवर्ग त्या काळाला समोर जाण्यासाठी स्वतःच्या परीने स्वतःमध्ये बदल घडवण्याच्या प्रयत्न करतोय एवढे मात्र नक्की
मोबाईल आणि सोशल मीडिया वापरण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा सकारात्मक आहे तसा नकारात्मक दृष्टिकोनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्या कुठे तरी समजून घ्यावे लागेल. फक्त समाजाला आणि मित्रपरिवाराला दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणारा तरुणवर्ग जास्त दिसत आहे. सतत व्हॉटस्ऍप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम इ. चा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे व आपल्याला हानीसुद्धा पोहचवत आहे. सोशल मीडियामुळे मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे कामातील आणि दररोजच्या व्यवहारातील गती व प्रगती कमी होतेय. जास्त करून रात्रीच्या वेळी जास्त मोबाईल वापरला जातो आणि मोबाईलमधून निघणार्या रेडीएशनमुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो व त्याचप्रमाणे मेंदूलाही ते खूप हानी पोहचवतात, परंतु याचा विचार कुणीच करायला तयार नाही.
सध्या मोबाईल हा जणू आयुष्याचा एक भाग असल्यासारखे आपण आज वागत आहोत. मोबाईलमुळे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेसुद्धा आहेत. सध्याचा काळ मोबाईल आणि सोशल मीडियाचाच आहे असे म्हणत सर्वच याच्या अधीन होत आहेत. मोबाईलमुळे इंटरनेटचे एवढे वेड लागून गेलेय की एखाद्याचा एखाद्या दिवशी नेटपॅक संपले की लगेच दहा ते पंधरा मिनिटांत तो नेटपॅकचा रिचार्ज करतो. म्हणजे ती व्यक्ती एक दिवस किंवा दोन दिवससुद्धा विना इंटरनेटशिवाय तो राहू शकत नाही. याच्यावरून लक्षात येते की आज मोबाईल आणि सोशल मीडियाचे किती व्यसन लागलेले आहे. म्हणून कुठे तरी या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि या मोबाईल व सोशल मीडिया वापरावर थोडेसे प्रमाण ठेवले पाहिजे, मोबाईल गरजेपुरता वापरला पाहिजे, सोशल मीडियावर ठरावीकच वेळ द्यायला पाहिजे, मोबाईलवर गेम खेळताना वेळेचे भान ठेवले पाहिजे की आपण किती वेळपासून आपण मोबाईलवर गेम खेळतोय या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवले पाहिजे तरच कुठे तरी या सर्व गोष्टीवर आळा बसेल. नाहीतर मोबाईल आणि सोशल मीडिया हे व्यसन कायमचेच आपल्यामध्ये घर केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला मात्र भोगावेच लागतील.




























































