
एस.एम.पाटील । परळी वैजनाथ
राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. गृह विभागाकडून एका विशेष योजने अंतर्गत यासाठी मंजुरी भेटली असून यासाठी 1.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या सीसीटीव्ही योजनेमुळे परळीच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेला आणखी बळ भेटणार आहे.
एका नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत परळी शहरातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, गर्दीचे ठिकाणे, प्रमुख बाजारपेठ, महत्वाच्या बँक आस्थापना, शहराचा प्रवेश व निर्गमन मार्ग या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत हे काम होणार असून याबाबतचा अध्यादेश दि. 30 रोजी गृह विभागामार्फत काढण्यात आला आहे. या योजनेमुळे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
परळी येथे सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी आम्ही केली होती.आता या योजनेला मंजुरी भेटल्याने पोलीस प्रशासनाला तिसऱ्या डोळ्याद्वारे लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. – जी. श्रीधरन, पोलीस अधीक्षक, जि. बीड































































