
सामना प्रतिनिधी । नांदेड
राज्यात 23 पोलीस उप अधीक्षकांना बदल्या देण्याचे आदेश गृह विभागाचे सचिव कैलास गायकवाड यांनी जारी केले आहेत. त्यात नांदेडचे गृह पोलीस उपअधीक्षक ए.जी.खान आणि बिलोलीचे उपअधीक्षक विशाल खांबे यांची बदली करण्यात आली आहे. नांदेडचे गृह पोलीस उपअधीक्षक पद रिक्तच आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 23 पोलीस उपअधीक्षकांना दिवाळीच्या आठवड्यात बदल्या दिल्या आहेत. नांदेडचे गृह पोलीस उपअधीक्षक अब्दुल गनी अब्दुल रशीद हे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ग्रामीण विभागात जाणार आहेत. त्यांच्याजागी तेथील सिद्धेश्वर भोरे येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभागाचे विशाल खांबे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम उपविभागात जाणार आहेत. भूम विभागातील सिद्धेश्वर धुमाळ बिलोली येथे येणार आहेत.
इतर बदल्या झालेले अधिकारी आणि बदलीची ठिकाणे आणि आधीची ठिकाणे
अनिल वडनेरे, – दहिवडी सातारा (पोलीस प्रबोधिनी नासिक)
विशाल मेहुल – सिल्लोड औरंगाबाद (धारणी-अमरावती)
निलीमा जाधव – सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (सहायक पोलीस आयुक्त आय जी कार्यालय नागपूर)
भरत गाडे – सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई (पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे बीड)
संजय पुज्जलवार – पांढरकवडा यवतमाळ (उमरखेड यवतमाळ)
रामचंद्र जाधव – सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (दहशवाद विरोधी पथक औरंगाबाद)
दिलीप गोडबोले – गणेशपुरी ठाणे (नागपूर शहर)
पुंडलिक सपकाळे – शहादा नंदुरबार (जात पडताळणी नासिक)
अश्विनी पाटील – अहमदपूर लातूर (मुंबई शहर)
दिलीप राऊत – ठाणे शहर (मुंबई शहर)
बाजीराव पाटील – लांजा रत्नागिरी (मुख्यालय सांगली)
किसान गावीत – ठाणे शहर (अकोला)
शशिकिरण काशीद – रोहा रायगड (वसमत हिंगोली)
महारु पाटील – जात पडताळणी नासिक (शहादा नंदुरबार)
अमोल कोळी – उमरखेड यवतमाळ (पांढरकवडा यवतमाळ)
संतोष वाळके – मुंबई शहर (परतूर जालना)
सतीश गोवेकर – नवी मुंबई (सायबर सेल)
सचिन सांगळे – जळगाव (लातूर शहर)

































































