गोवेरी भजन स्पर्धेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

श्री देव सत्पुरूष कला क्रिडा मंडळ ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि देवस्थान कमिटी, गोवेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. वसंत गावडे बुवा स्मृती चषक जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत बोरदेकर प्रा. भजन मंडळ, केरवडेने प्रथम क्रमांक पटकाविला.

द्वितीय क्रमांक पांडुरंग प्रा.भजन मंडळ(डिगस),तृतीय रवळनाथ प्रा.भजन मंडळ(पिंगुळी) तर उत्तेजनार्थ क्रमांक सद्गुरू प्रा.भजन मंडळ(तुळस), भालचंद्र सोहम गु्रप(कुडाळ) व ब्राम्हण प्रा.भजन मंडळ(नेमळे) यांनी मिळविला. वैयक्तिक बक्षिसामध्ये उत्कृष्ट गायक, प्रसाद आमडोसकर (महापुरूष प्रा.भजन मंडळ, पिंगुळी), हार्मोनियम-विशाल राणे (भालचंद्र सोहम गु्रप कुडाळ), झांजवादक-शैलेश नांदोस्कर (ब्राम्हण प्रा.भजन मंडळ, नेमळे) व कोरस-गोठस प्रा. भजन मंडळ, वजराठ यांनी मिळविला.

स्पर्धेचे उद्घाटन तेंडोली येथील सामाजिक कार्यकर्ते अरूण राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच सत्यवान गावडे, वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे, देवस्थान कमिटी अध्यक्ष संजय गावडे, कानु मुळीक, विठ्ठल गावडे, गोविंद गावडे, परशुराम गावडे, एकनाथ जाधव, रमाकांत मुळीक आदी उपस्थित होते. बक्षिस वितरण प्रसंगी जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर गावडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. देवस्थान कमिटी मंडळ व वाचनालयाचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महेश गावडे यांनी केले.