
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम उपनगरांमध्ये वाढणाऱया गृहनिर्माण प्रकल्पांमुळे तेथील मलनि:सारण वाहिन्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. यावर मात करण्यासाठी शिवसेनेने दहिसरमध्ये मायक्रोटनेलद्वारे मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे वचन मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दिले होते. त्यानुसार या महत्त्वाकांक्षी मायक्रोटनेल प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
माजी विभागप्रमुख प्रकाश कारकर व नगरसेवक हर्षद कारकर यांच्या प्रयत्नांतून माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान, ओवरीपाडा ते रंगनाथ केसकर मार्ग येथे रेल्वे मार्गाखालून चार फूट व्यासाची व 1800 मीटर लांबीची मलनिŠस्सारण वाहिनी टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा फायदा अशोकवन व दहिसर पूर्व परिसरातील रहिवाशांना होणार आहे.
मायक्रोटनेल प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राज्याचे गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा रिद्धी खुरसुंगे उपस्थित राहणार आहेत.


























































