विरोधकांची जिरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- राज्यमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

माझे काही विरोधक माझ्या कामांवर जळत आहेत. काही तरी उचापत्या करुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जनतेच्या आशीर्वादाने शिवसेनेचा अश्वमेध चौफेर उधळतो आहे. यामुळे या विरोधकांची जिरवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा सज्जड इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

पाळधी येथे रस्ते व बसस्थानकातील विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी राज्यमंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख गजानन पाटील, पं. स. सभापती सुरेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, डी. टी. ओ.घुले, विभागीय अभियंता आर.व्ही.चव्हाण, आगार व्यवस्थापक सदणेश बोरसे, सा.बा.चे उपअभियंता महेश ठाकूर, पं.स.सदस्य प्रेमराज पाटील,आसाराम कोळी,सरपंच प्रकाश पाटील, वैशाली माळी, सचिन पवार, दिनकर पाटील ,परिवहन विभागाचे शाखा अभियंता बी.एन.पठार, माळी उपसरपंच चंदन कळमकर, अनिल कासट, संजय महाजन,निवृत्ती माळी, अनिल कोळी,अनिल माळी, सागर शिरोडे,बाळू महाजन,सुधाकर पाटील, टिकाराम पाटील, सचिन झंवर व मुकेश भोई आदी उपस्थित होते.

४ कोटी २१ लाखाच्या कामांचे झाले भूमिपूजन
पाळधी बायपास -पथराड – झुरखेडा – विहिर फाटा – दहीदुल्हा या १४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे- ३ कोटी ४१ लक्ष तसेच पाळधी येथील बसस्थानकातील वाहनतळाचे काँक्रिटीकरण, पाण्याचे टाकीचे बांधकाम, महिला व पुरुषांसाठी शौचालय बांधकाम, हायमस्ट लॅम्प बसविणे या ८० लक्ष कामांचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे वचन पूर्ती झाल्याबद्दल पाळधी , झुरखेडा व दहिदुल्ला परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आहे.

यावेळी चांदसर सरपंच सचिन पवार व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य मुकुंदराव नन्नवरे यांनी यांनी केले. तर आभार जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे आबा माळी, उपसरपंच चंदन कळमकर, पप्पू माळी दिपक सावळे ,निवृत्ती माळी, संजय पांडे, किशोर सोनवणे व माजी सरपंच अरुण पाटील यांच्यासह परीसरातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पाळधी,पथरड, झुरखेडा, दहिदुल्ला व परिसरातील ग्रा.पं.चे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.