पायलटच्या चुकीमुळे दिल्लीहून कंधारला जाणारे विमान झाले ‘हायजॅक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शनिवारी दुपारी ३.३० वाजता दिल्लीहून कंधारला निघालेले विमान हायजॅक झाले. सर्व सुरक्षायंत्रणा कामी लागली. तब्बल दोन तास संपूर्ण विमान तपासले गेले परंतु कुठेच दहशतवादी सापडले नाही. कारण विमान हायजॅक झालेच नव्हते. पायलयटने चुकून हायजॅकचे बटण दाबले आणि हा सगळा गोंधळ उडाला होता.

दिल्ली विमानतळाहून अफागाणिस्तानमधील कंधारसाठी FG312 या विमान उड्डाण घ्यायला तयार होते. या विमानात १२४ प्रवाशांसह ९ कर्मचारी होते. पायलटने विमान सुरू करताना चुकून विमान हायजॅक झाल्यावर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यासाठीचे बटण दाबले. त्यामुळे एनएसजी कमांडो आणि इतर सुरक्षा रक्षकांनी विमानाला सर्व बाजूंनी वेढा घातला. सर्व सुरक्षा रक्षकांनी तब्बल दोन तास विमनाची कसून तपासणी केली. अखेर पायलयटने चुकून हे बटण दाबल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे प्रवाशांची आणि सुरक्षारक्षकांची चांगलीचे भंबेरी उडाली होती. या घटनेबाबत कुठल्याही अधिकार्‍यानी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.