
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
जानेवारी ते जून 2018 या सहा महिन्यांत हिंदुस्थानवर 6 लाख 95 हजार सायबर हल्ले झाले आहेत. हे सायबर हल्ले अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी आणि नेदरलॅण्डच्या हॅकर्सने केले. हिंदुस्थानी हॅकर्सनेही दुसऱया देशांवर सायबर हल्ले केले. यात ऑस्ट्रिया, नेदरलॅण्ड, इंग्लंड, जपान आणि युक्रेन या देशांचा समावेश आहे. ‘एफ सिक्युअर’ या सायबर सुरक्षा संस्थेने केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
- हिंदुस्थानवर रशियाकडून सर्वात जास्त सायबर हल्ले झाले. रशियाने हिंदुस्थानवर 2 लाख 55 हजार 589 हल्ले केले. अमेरिकेने 1 लाख 3 हजार 458, चीनने 42 हजार 544, नेदरलॅण्डने 19 हजार 169 तर जर्मनीने 15 हजार 530 हल्ले केले.
- जगात सायबर हल्ले झेलण्यात हिंदुस्थानचे स्थान 21 वे आहे.
- हिंदुस्थानी हॅकर्सने सर्वाधिक सायबर हल्ले ऑस्ट्रियामधील संस्थांवर केले. एकटय़ा ऑस्ट्रियावर हिंदुस्थानी हॅकर्सने 12 हजार 540 हल्ले केले.
- सायबर हल्ले करण्यात हिंदुस्थानचा नंबर 13 वा आहे.
- गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या आग्रहामुळे हिंदुस्थानमध्ये डिजिटायझेशन होत आहे, मात्र हे करताना सायबर सुरक्षेची खबरदारी घेतली जात नाही. वाढत्या डिजिटायझेशनमुळे हा धोका अधिक वाढला आहे, असा इशारा एफ सिक्युरचे उपाध्यक्ष लेसजेक तसिम्सकी यांनी दिला आहे.




























































