
सामना ऑनलाईन । अकोला
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री बुधवारी अकोल्यात आले होते. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप सरकारकडे आलेला नाही.राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटलेला नाही असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. हा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत येणे अपेक्षीत होते, त्याची पुर्तता झाली आहे. लवकरच या अहवालाची पुढील कार्यवाही पुर्ण केली जाईल आणि पुढील 15 दिवसात आरक्षणाचा मुद्दा निकालात निघेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अकोला जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ आणि विविध विकास कामांच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री बुधवारी अकोल्यात आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप सरकारकडे आलेला नाही. या अहवालाच्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये विविध वृत्ते झळकली आहेत.अहवालात काय शिफारसी असतील याचा अंदाज घेताना अनेकांनी अहवालच हाती लागल्यासारखी मांडणी केली असून ही केवळ पतंगबाजी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटलेला नाही असा दावा त्यांनी केला. हा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर त्यासदंर्भातील पुढील कार्यवाही पुर्ण करून तो अहवाल सार्वजनिक करायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.



























































