क्रिकेट मॅचदरम्यान दोन गटात राडा, गोळीबारात 7 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन। लाहोर

खेळादरम्यान वाद किंवा मारहाणीचे प्रकार होत असतात. पण पाकिस्तानमधील पख्तुनवा प्रांतात शनिवारी क्रिकेट मॅचवरून दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी राडेबाजांनी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले आहेत. अबोदाबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पख्तुनवा प्रांतातील अबोदाबाद जिल्ह्यात 15 वर्ष वयोगटातील मुलांचे क्रिकेट सामने रंगले होते. या मुलांबरोबर त्यांचे नातेवाईक व गावातील मंडळीही ही मॅच बघण्यासाठी आले होते. जसजशी मॅच रंगात येत होती. तसेतसे प्रेक्षक म्हणून आलेले लोकांनाही चेव चढला होता. त्याचवेळी एकमेकांना चिथवण्यासाठी हे दोन्ही गट घोषणाबाजी करू लागले. त्यावरून दोन्ही गटात जोरदार वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर अचानक गर्दीतील काहीजणांनी हवेत बंदूकीच्या फैरी झाडत दुसऱ्या गटावर गोळीबार केला. यात 7 जण ठार झाले असून यावेळी झालेल्या धावपळीत शेकडो लोक जखमी झाले आहेत.