साईभक्ताकडून साईंना 300 ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। शिर्डी

शिर्डीच्या साईबाबांना आज अहमदाबाद येथील एका भाविकांने तब्बल 300 ग्राम वजनाचा सोन्याचा सुवर्ण हार अर्पण केला. शिर्डी साईबाबांना आम्ही एक नवस केला होता आणि साईबाबांनी आमचा नवस पूर्ण केल्याने आम्ही साईबाबांना 300 ग्राम वजनाचा सुवर्ण सोन्याचा हार अर्पण केला त्याची किंमत 9 लाख रुपय असल्याचे भाविका कडून सांगण्यात आले आहे.

sai-fin

या भाविकांची इच्छा होती की आपण बाबांना दिलेले दान हे गुप्त दान म्हणून द्यावे यामुळे या भाविकांने आपले नाव गुप्त ठेवले आहेत. हा सोन्याचा सुवर्ण हार अहमदाबाद येथील ज्वेलर्सकडून बनवण्यात आला आहे. अतिशय सुंदर आणि नक्षीमय कारागिरी या हाराला करण्यात आली आहे. शिर्डी साईबाबांना सोन्याचा सुवर्ण हार अर्पण करणाऱ्या साई भक्त परिवाराचा साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी साई मूर्ती तसेच शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले आहे. साईबाबांच्या सायंकाळी होणाऱ्या धूपा आरतीच्या नंतर या साई भक्त परिवाराने हा सोन्याचा सुवर्ण हार अर्पण केला असून साई संस्थानच्या वतीने हा हार साईबाबांना अर्पण करण्यात आला आहे.