…जशा गुलाबाच्या पाकळय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीच्या दिवसांत ओठांना भेगा पडतात, ते तडकतात, सुकतात. अशावेळी त्यांची काळजी घेतली पाहिजे. घरच्या घरी ओठांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया…

> एक चमचा मधात दोन चमचे साखर टाका. हे मिश्रण दोन मिनिटे ओठांवर लावून हळूहळू बोटाने त्याच्यावर मसाज करा. काही वेळाने साध्या पाण्याने धुकून टाका. ओठांवरची मृत त्वचा निघून जाऊन ते मऊ होतील.

> दुधाच्या सायीमध्ये मोठय़ा प्रमाणात चरबी असते. ते चांगले मॉइश्चरायझर असते. म्हणून भेगा पडलेल्या ओठांवर दिवसातून तीन वेळा साय लावा. ओठ गुलाबी होतील.

> एक चमचा तुपामध्ये चिमूटभर मीठ टाकून गरम करा. मग दिवसातून पाच-सहा केळा लीप बाम सारखं लाऊन मालिश करा. रात्री झोपताना थोडसं तूप ओठांवर लाकलं तर ओठ फाटत नाहीत.

> भोपळ्याची पेस्ट एक चमचा घेऊन त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा मध घाला. हे मिश्रण प्रीजमध्ये थंड करा. हा थंड बाम दिवसातून 3 ते 4 वेळा ओठांना लावल्यास ते मुलायम व आकर्षक होतील.