
सामना ऑनलाईन, मुंबई
इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर या लढतीत मिताली राजला वगळल्याचा फटका टीम इंडियाला बसला अशी टीका चोहोबाजूंनी होऊ लागली. या प्रकरणावर प्रशासकीय समितीच्या डायना एडुलजी म्हणाला, अंतिम अकरा जणांच्या चमूत कोणाला घेतले किंवा कोणाला घेतले नाही. यामुळे आपण हरलो नाही. तो दिवस हिदुस्थानचा नव्हताच, असेही त्या यावेळी म्हणाला. हिंदुस्थानने त्या दिवशी सामना जिंकला असता तर वाद निर्माणच झाला नसता, असेही त्यांना वाटते. दरम्यान, हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत कौर व मिताली राज यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी व क्रिकेट ऑपरेशन्स अधिकारी साबा करीम यांची सोमवारी भेट घेतली. दोघींनी आपली मते व्यक्त केली असल्याचे राहुल जोहरी यांनी यावेळी सांगितले.


























































