चिदंबरम यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एअरसेल मॅक्सिस घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात खटला चालवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम या दोघांना दिलेला अंतरिम जामीन 18 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी सीबीआयने कोर्टात स्पष्ट केले की, या दोघांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते चिदंबरम यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.

पी. चिदंबरम यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांना आरोपी क्रमांक 1 असे म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर या चार्जशीटमध्ये इतर 8 जणांची नावेही आहेत. एअरसेल मॅक्सिस खटल्यात पतियाळा हाऊस कोर्टाने सोमवारी सुनावणी घेतली. याच प्रकरणात सीबीआयनेही वेगळी चार्जशीट दाखल केली आहे.