बस -ट्रकच्या धडकेत 25 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। नेवासा

नगर संभाजीनगर राजमार्गावर खडकाफाटा दरम्यान बस व ट्रकची धडक झाल्याने यात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यातील दोन प्रवाशांना नगर तर एकाला संभाजी नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते. मेहकर आगाराची मेहेकर पुणे ही बस(क्रमांक एम.एच- 40 वाय-5346) बस पुण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी ट्रकने बसला धडक दिली.

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या याची नावे : पुढीलप्रमाणे

जाकीर शेख(वय-45, संभाजी नगर), मारुती शेकरे(65, हातगाव), भगवान भुतेकर(70, पळसखेड), मंदा अशोका चांगाडे(40), संजय दिगंबर जोशी( मेहकर), सावित्रीबाई भगवान भुतेकर(60, पळसखेड), प्रकाश भिमराव शिंदे(32), शशीकला नलगे(60, शिरोडा), विश्वास बबन सुर्वे ( 24, पुणे), त्रिबंक बडे( 72), प्रल्हाद टापरे 65, परांडा), पदमावत उदळकर(65, मेहकर), सिताराम पवार(72, हातगाव), सुनंदा मोहन चव्हाण(45), नारायण शिंदे, दगडाई टापरे, सुलोचना काळे, कावेरी बोंदरे, मुक्ता शिंदे(परतूर)