चासनळी येथे रोहित्रांची चोरी ,35 किलो ताब्‍यांची तार लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

तालुक्यातील चासनळी येथे शेती गट नं. 1 येथील 25 केव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र चोरटयांनी मंगळवारी पोल वरून चोरले. तसेच दोन्‍ही रोहित्रातील सुमारे 35 किलो वजनाची 50 हजार रूपये किमतीची तांब्‍यांची तार चोरून नेली. याप्रकरणी अभियंता दिपक मनोहर मोगल यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

सध्या ज्या शेतक-यांकडे थोडयाफार प्रमाणात पाणी आहे ते गहु कांदे आदि भूसार पिकाची लागवड करीत आहे, मायगांवदेवी परिसरातील शेतकरीही रब्बीची लागवड करीत आहे. दोन्‍ही वीज रोहित्र चोरीस गेल्याने ग्राहक व शेतकरी हवालदिल झाले आहेत. वीज रोहित्रातील ऑईलची मोठया प्रमाणात चोरी होत होती आता थेट वीज रोहित्रच चोरीस जायला लागले आहेत. थंडी असल्‍याने चोरांचे चांगलेच फावत आहे. मात्र हि बाब गंभीर असुन विज वितरण कंपनी, पोलीस, शेतकरी व ग्राहक यांना आता जागता पहरा ठेवावा लागणार आहे. कारण आता ऑईल सोडून तांब्‍याच्‍या तारा चोरणारी टोळी कार्यरत झालेली आहे. तिचा वेळीच बंदोबस्‍त करावा लागणार आहे. या वीज रोहित्रास वेल्डींग केली असती तर ते चोरीस गेले नसते असे या परिसरातील ग्राहकांचे म्हणणे आहे.