
सामना प्रतिनिधी । मुंबई
सर्वाधिक 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणार्या मुंबई क्रिकेट संघाला शनिवारी घरच्या वानखेडे स्टेडियमवर लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार प्रियांक पांचाल (नाबाद 112 धावा) व कथन पटेल (55 धावा) या सलामी जोडीने जबरदस्त फलंदाजी करीत गुजरातला मुंबईवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार्या मुंबईला यंदा सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेत सूर गवसेना. आतापर्यंत झालेल्या तीन लढतींपैकी त्यांना एकमध्ये पराभव दर दोन लढतींमध्ये ड्रॉवर समाधान मानावे लागले आहे. गुजरातने एलिट ‘अ’ गटामध्ये दोन विजयांसह 16 गुणांसह ताजा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतलीय.
मुंबईकडून मिळालेल्या 204 धावांचा पाठलाग करणार्या गुजरातने अवघा एक गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. प्रियांक पांचाल व कथन पटेल या जोडीने 128 धावांची दमदार सलामी दिली. कथन पटेलने 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रियांक पांचालने 3 षटकार व 11 चौकारांसह नाबाद 112 धावांची खेळी केली. भार्गव मेराईने नाबाद 39 धावा केल्या. कर्णधार धवल कुलकर्णी ऍण्ड कंपनीला सपाटून मार खावा लागला.




























































