
सामना ऑनलाईन । पालघर
पालघरमध्ये एमएमआरडीने सूर्या प्रादेशिक जलवाहिनीचे काम सुरू केले. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी हालोली येथे हे काम बंद पाडले. हे सर्व शेतकरी प्रकल्प बाधित आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएमआरडीए, वन विभाग आणि प्रकल्प बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडावा आणि नंतरच जलवाहिनीचे काम सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याआधी बुधवारी बैठकीचे आयोजन केल्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र असे असताना एमएमआरडीएने अगोदरच पोलीस बंदबस्तामध्ये कामाला सुरुवात केली. यावेळी हालोली बोट ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच समृद्धी सांबरे, उपसरपंच अजय पाटील, आदिवासी पुनर्वसन आंदोलन समितीचे अविनाश पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. आंदोलकांनी काम बंद पढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.























































