
सामना ऑनलाईन,ग्वांझू
हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिच्यासमोर बुधवारपासून सुरू होणाऱया जागतिक टूअर फायनल्स या मानाच्या स्पर्धेत कडवे आव्हान असणार आहे. पी. व्ही. सिंधू ‘अ’ गटात असून याच गटामध्ये अकाने यामागुची, तेई यिंग, बेईवेन झँग या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी पी. व्ही. सिंधूला सर्वस्व पणाला लावावेच लागणार आहे. दरम्यान, पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणाऱया समीर वर्मासमोर तुलनेने सोपे आव्हान असणार आहे.



























































