शेतकरी करणार 15 डिसेंबरला आत्मदहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना प्रतिनिधी । नगर

कांद्याच्या घसरलेल्या बाजार भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतापलेल्या कांदा विक्रेतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतापलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांने आत्मदहनाचा मार्ग निवडला आहे. या शेतकर्‍यांने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून कांद्याच्या भावावर तातडीने मार्ग न काढल्यास 15 डिसेंबर रोजी नगरमधील माकेटयार्डमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

नगर तालुक्यातील खडीक येथील तरुण शेतकरी राहूल बहिरट या कांदा उत्पादक शेतकऱ्याने या संदर्भात पंतप्रधानांच्या नावे स्पीड पोस्टने निवेदन पाठवले असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसिदार आणि मार्केट कमिटीला दिल्या आहेत. या निवेदनात बहिरट यांनी म्हटले आहे की, माझा चार एकर कांदा आहे. परंतु बाजार भावाची अशी अवस्था झाली आहे की, उत्पादन खर्चही निघत नाही. या कृषीप्रधान देशात शेतकर्‍यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. मार्केटमध्ये कांदा आणायला 8 ते 10 रुपये एवढा खर्च होतो आणि माझ्या कांद्याला अवघा 3 रुपये 50 पैसे किलो भाव मिळाला आहे. तरी याबाबत तातडीने लक्ष घालावे. हा प्रश्‍न निकाली काढावा अन्यथा 15 डिसेंबरला आत्मदहन करणार असल्याचा इशारा बहिरट यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.